खेळाडूंच्या सुविधांसाठी शासन तरतूद करणार

0

हडपसर । देशातील प्रत्येक नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांचा सामाजिक, शैक्षणिक व सर्वांगीण विकास झाला पाहिजे, खेळाडू आपल्या देशाचे नाव उज्वल करीत असतात त्यांना सुविधा व संधी मिळाल्या पाहिजेत. राज्य शासन व महापालिका खेळाडूंना प्रोत्साहनासाठी तरतूद करते असे प्रतिपादन राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

पुणे महापालिका व पुणे जिल्हा कब्बडी असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने काळेपडळ येथील प्रगती विद्यालयाच्या मैदानात हॅन्डबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.खासदार अनिल शिरोळे, नगरसेवक मारुती तुपे, विकास रासकर, सतीश जगताप, प्रशांत सुरसे, संजय शिंदे, रवी तुपे, नितीन होले, विनोद धुमाळ, आबासाहेब शिंगोटे, किशोरी शिंदे, माऊली कुडले, अमित गायकवाड, सुकन्या गायकवाड, स्मिता गायकवाड, तानाजी देशमुख, रुपेश मोरे, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन नगरसेवक मारुती तुपे यांनी केले.

सर्वसामान्यांचा नगरसेवक म्हणून मारुती तुपे यांची ओळख आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास त्याप्रमाणे कार्य केले पाहिजे, स्पर्धेत भाग घेतल्यावर पराभूत झाल्यावर खचून न जाता पुन्हा नव्याने खेळात सरसपणे पुढे आले पाहिजे, असे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले.