खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासून प्रगती साधावी

0

जळगाव । जळगाव- खेळ हा खेळाडूचा विचार आणि मनाचा ठेवा असतो. त्यामुळे तो खेळापुरता मर्यादित न ठेवता त्यातून खेळाडूवृत्ती जोपासून आपली प्रगती साधावी. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले. कृषि विभाग आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ येथील कांताई सभागृहात आज संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. कराळे हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बँक ऑफ महाराष्ट्र चे श्री. किणीकर, रामेतीचे प्राचार्य सुनिल वानखेडे, पद्माकर तांबट, बाळासाहेब सुर्यवंशी, कैलास मगर, डॉ. सुदाम पाटील, डॉ. बाहेती, प्राची चौधरी, फारुख शेख आदि उपस्थित होते.

खेळामुळे माणूस निरोगी राहतो
श्री. कराळे म्हणाले की, खेळामुळे माणूस नेहमी निरोगी राहतो. शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करणे अभिप्रेत आहे. घटनेच्या चौकटीत काम करीत असताना त्यांनी आपली खेळाडूवृत्ती जोपासून आवडही जोपासल्यास त्यांना नक्कीच प्राविण्य मिळते, असे मतही व्यक्त करुन सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.