कराची : पाकिस्ताचा क्रिकेटर शाहिद अफ्रिदीने काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केल्यानंर पाकिस्तान टीमचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी त्याला समज दिली आहे. खेळाडूंनी राजकीय विधान तसंच टीका टाळायला हवी असं मत मियादाँद यांनी कराचीत एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आहे.
शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी काश्मीर सांभाळणं पाकिस्तानाला पेलवणारं नाही असं विधान केलं होतं. या विधानामुळे आफ्रिदी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या विधानाला भरपूर प्रसिद्धी मिळाली.आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना भारतीय माध्यमांनी माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप आफ्रिदीने केला. यानंतर अशा राजकीय वादांत पडूच नये अशी समज जावेद मियाँदाद यांनी त्याला दिली.’ आपला खेळ खेळणं हे खेळाडूंचं काम असतं. राजकीय आणि सामाजिक टीकेपासून त्यांनी कायम दूर राहायला हवं’. असं मियादाँद म्हणाले.