ठाणे। मी पॅराऑलिम्पियन आहे. त्यामुळे परदेशात अडचण जाणवत नाही. पण, परदेशात जाणार्या पॅरा, दिव्यांग, अंध खेळाडूच्या मदतीसाठी हेल्पलाइनची आवशक्यता असल्याचे मत नुकताच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या पॅरा ऑलिम्पियन देवेंद्र जझरिया यांनी व्यक्त केले. पॅरा ऑलिम्पिकमधील दुहेरी सुवर्णपदक आणि पदमश्री ’किताब विजेते देवेंद्र जझरिया आपण सारे या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या क्रांती दौड स्पर्धेच्या उदघाटनासाठी जझरिया ठाण्यात आले आहेत.
आपण सारे संस्थेतर्फे 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाचे औचित्य साधून 6 ऑगस्ट रोजी विविध वयोगटाच्या रॉड रेसेसचे आयोजन करण्यात आले आहे.
तो इशारा गंभीर…
जागतिक मैदानी स्पर्धा सध्या लंडन येथे सुरू आहे. विश्वविक्रमी यूसेन बोल्टची ही शेवटची स्पर्धा आहे. या स्पर्धेआधी डोपिंग बंद झाले नाही तर मैदानी स्पर्धांचा शेवट होण्याची भीती बोल्टने व्यक्त केली होती. जझरिया म्हणाले की, बोल्टने दिलेला इशारा गंभीर आहे. डोपिंगच्या विरोधात जागृती करण्यासाठी त्याच्या दुष्परिणामांची शालेय स्तरापासून माहिती करून द्यायला पाहिजे. याशिवाय कुठल्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे याची माहिती देणारी सक्षम यंत्रणा देशात उभारली पाहिजे.