चिंचवड : महाविद्यालयात विविध स्पर्धेत जे खेळाडू विशेष चमक दाखवितात. त्यांना त्यांच्या पालकांनी देखील पाठींबा देण्याची आवश्यकता आहे. शासनाने देखील विविध क्रीडा खेळाचे संवर्धनाकरीता क्रिडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात सुधारीत नियमावलीला मान्यता दिली आहे. शालेय स्तरावरील अशा खेळाडूंना सर्व प्रकारची मदत केली तर क्रिडा क्षेत्रात या शहरातील खेळाडू, देश पातळीवर चमकतील. यासाठी खेळाडूच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दिपक शहा यांनी प्रतिभा महाविद्यालयातील तीन खेळाडूंचा सत्कार करताना केले. कमला शिक्षण संस्था संचालीत प्रतिभा इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एम.बी.ए.च्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी शौनक सपकाळ यांने नुकतेच विशाखापट्टणम येथे झालेल्या आदीवासी समाजाच्या खेळाडूंसाठी ही पहिली राष्ट्रीय हिल व्हॅलीज आणि माऊटन्स (एच.व्ही.एम) शरीर सौष्ठव स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आली. त्यात 171 से.मी. व त्यापुढील उंचीच्या खुल्या गटात मेन फिजीक स्पर्धेत सुवर्णपदक व विविध गटाच्या एकूण सहभाग घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत 4 था क्रमांक पटकाविला. इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
हे देखील वाचा
प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्यूटर स्टडीज मध्ये बी.बी.ए. शाखेतील टी.वाय. मध्ये शिक्षण घेत असलेला धावपट्टू संदीप बहोत याने चालू वर्षभरात राज्य स्तरावरील विविध ठीकाणी झालेल्या 100 मीटर धावणे, 6,10,21 किलोमीटर धावणे स्पर्धेत सिल्व्हर व ब्रांझ पदके पटकावून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रिडा समितीच्या वतीने आयोजित मुलीच्या बेसबॉल स्पर्धेत महाविद्यालयातील खेळाडूंनी तिसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेतील सहभागी संघातील विद्यार्थीनी आरती बहेनवाल यांची आंतर विभाग स्पर्धेसाठी निवड झाली या प्रित्यर्थ या तीन खेळाडूंचा विशेष सत्कार संस्थेचे सचिव डॉ. दिपक शहा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे यांनी केले तर आभार प्रा. पांडुरंग इंगळे यांनी मानले.