दौंड । खेळाच्या माध्यमातून सांघिक भावना व राष्ट्रप्रेम जागृत होते. ग्रामीण भागातील युवकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांतून आपले कर्तृत्व दाखवावे, असे आवाहन शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.कळंब येथील मैदानात झालेल्या आमदार चषक खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, बाजार समितीचे उपसभापती यशवंतराव माने, पंचायत समिती सदस्या डॉ. शैलजा फडतरे, माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे, सतीश पांढरे, सरपंच उज्ज्वला फडतरे, तेजसिंह पाटील, डी. एन. जगताप, राष्ट्रवादी युवक जिल्हा संपर्कप्रमुख सागर मिसाळ आदी उपस्थित होते.
32,222 रुपये, सन्मानचिन्ह
येडशी (जि. उस्मानाबाद) व डोर्लेवाडी (ता. बारामती, जि. पुणे) या दोन संघांत अंतिम लढत झाली. यामध्ये येडशीच्या संघाने 3 गुणांनी विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. 32,222 रुपये, सन्मानचिन्ह देऊन विजयी संघाचा सत्कार करण्यात आला. द्वितीय क्रमांक डोर्लेवाडी संघाने मिळविला. तृतीय क्रमांक इंदापूरच्या बोरी संघाने, तर चतुर्थ क्रमांक सोलापूरच्या संघाने प्राप्त केला.