50 लाखांचे अपसंपदा प्रकरण ; दोघा आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
नंदुरबार :- ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल 50 लाखांची बेकायदा मालमत्ता आढळल्याने खोंडामळी मंडळाधिकारी श्रीकांत पोपट बोरसे व त्यांच्या पत्नी सुवर्णा श्रीकांत बोरसे यांच्याविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी बोरसे यास शुक्रवारी रात्री अटक केल्यानंतर त्याची पत्नी सुवर्णा बोरसे यांना शनिवारी दुपारी अटक करण्यात आली.
आरोपी पती-पत्नी यांना नंदुरबार न्यायालयाने दोन दिवसांची म्हणजे सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे व सहकारी तपास करीत आहेत.