खोंडामळी मंडळाधिकार्‍यांकडे सापडले 50 लाखांचे घबाड

0
एसीबीने केला गुन्हा दाखल ; कारवाईने खळबळ
नंदुरबार :- ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल 50 लाखांची बेकायदा मालमत्ता आढळल्याने खोंडामळी मंडळाधिकारी श्रीकांत पोपट बोरसे व त्यांच्या पत्नी सुवर्णा श्रीकांत बोरसे यांच्याविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे यांनी फिर्याद दाखल केली. लोकसेवकाविरूध्द गुन्हा दाखल होण्याची दोन दिवसात दुसरी घटना आहे.