नवापूर । तालुक्यातील खोकसा येथे पेसा अंतर्गत नियम 43 अन्वये केलेल्या बाजार व्यवस्थापन, वन सरंक्षण दल ,व तंटा मुक्ती, बाबत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील पेसा अंतर्गत नवीन आठवडे बाजार भरवणारी खोकसा ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. या अगोदर पेसा अंतर्गत तलाव व्यवस्थापन, वृक्ष पुनर्लागवड, सामूहिक दावे अशी महत्वाचे उपक्रम या ग्रामपंचायतीने पूर्ण केले आहेत.
ग्रामसभेच्या माध्यमातून नियोजन
ग्रासभेच्या माध्यमातून बाजाराचे व्यवस्थापन होत असून यामुळे ग्रामसभा कोष समितीचे उत्पन्न वाढणार आहे. गावातील कुटुंबाना उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. गावातील हा आठवडी बाजार दर मंगळवारी भरविला जाणार असल्याने जास्तीत जास्त व्यापारी, ग्राहक व विक्रेते यांनी बाजारात दुकाने लावावीत अस आवाहन बाजार समिती खोकसा यांनी केले आहे.
ग्राहकांची गर्दी
खोकसा शेजारील असलेली गावे ,बोरपाडा, कामोद, करंजीबु, नागझरी, सरी, कोटखांब, साक्री तालुक्यातील उमरपाटा आदी गावांचे ग्राहकांची मोठी गर्दी बाजारात होत आहे लोकसहभागातून वन संरक्षण दला ची ग्रामसभेने स्थापना करून वन व्यवस्थापण समितीच्या नियंत्रनाखाली सदर दल वनांचे रक्षण करणार आहे. मेळाव्यात वन संरक्षण दलाला टी -शर्ट वाटप करण्यात आले. गावात तंटामुक्तीसाठी ग्रासभेने गावात शांतता प्रस्थापित करण्याचे ठरविले आहे.
गावातील तंटा गावातच मिटविणार
गावातील तंटा गावातच मिटविला जाईल असे सरपंच यांनी सांगितले. पेसा समन्वयक यांनी पेसा कायदा व ग्रामसभा स्वशासन यावर मार्गदर्शन केले. ग्रामसेवक कैलास सोनवणे व सरपंच यांचे या उपक्रमाबद्दल सर्वांनी कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत,गटविकास विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,विसरवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस सहायक पोलिस निरीक्षक धंनजय पाटील,सहाय्यक,आर.सी.गावीत प्रकल्प अधिकारी.देसाई ,वनपरिक्षेत्र अधिकारी .पवार ,तालूका पेसा समन्वयक विजय ठाणकर ,सन्मा.सरपंच ,वनरक्षक,ग्रामसेवक,ग्रा.प.सदस्य,व ग्रामस्थ उपस्थित होते.