खोचक प्रश्‍नावर मितालीची गुगली

0

इंग्लंड । भारतीय महिला क्रिकेटची सचिन तेडुलकर असलेल्या मिताली राजने महिला क्रिकेटकडे होणार्‍या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे. स्पर्धेपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या डिनर पार्टीमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाची कर्णधार मिताली राजला एका पत्रकाराने तुमचा आवडता क्रिकेटर कोण? असा प्रश्न विचारला होता.

यावेळी कोणत्याही क्रिकेटच्या नाव न सांगता मिथालीने पत्रकाराला प्रतिप्रश्न केला. मितालीने या पत्रकाराला म्हटले की, मला विचारलेला प्रश्न तुम्ही भारतीय पुरुष संघातील खेळाडूला विचारु शकला का? तुम्ही त्यांना विचारा की, महिला क्रिकेटमधील कोणती खेळाडू आवडते.