मुंबई: भाजप-शिवसेनेत बिनसले आहे. आज मुख्यामात्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. भाजप स्वत:ला हिंदुत्ववादी समजत आहे, मात्र खोटे बोलणारे हिंदुत्त्वाच्या व्याख्येत बसत नाही अशा तिखट शब्दात टीका केली. राम मंदिराचा निकाल लागण्याची शक्यता आहे, याचे श्रेय भाजप घेणार का? याबाबत बोलताना त्यांनी खोटे बोलणारे कसे हिंदुवादी होतील. रामाचे भक्त कधीही खोटे बोलत नाही असेही त्यांनी सांगितले.