खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करणे गोटेंचा उद्योग; मंत्री डॉ.भामरे यांचा टोला

0

धुळे-माझ्या मुलाच्या हॉस्पिटला शासनाकडून ४५ कोटी रुपये मिळाले असा खोटा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला. माझा मुलगा आणि तीन कॅन्सर सेशलिस्ट यांनी मिळवून हे हॉस्पिटल सुरु केले आहे. एचडीएफसी बँकेकडून १८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. परंतु आयुष्यभर सतत खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करणे एवढाच त्यांचा उद्योग आहे असा टोला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभास भामरे यांनी लगावला आहे.

सध्या धुळे शहरात महानगर पालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच मंत्री भामरे आणि आमदार गोटे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहे.

आमदार गोटे यांना पक्षाची चौकट मान्य नाही. हुकूमशाही वृत्तीचे ते आहे. याचा त्रास पक्षालाही होतो व कार्यकर्त्यांनाही देखील. भारतीय जनता पक्षात मनमानी चालत नाही. आ.गोटे यांनी मंत्री गिरीष महाजन यांच्यावर अतिशय शेलक्या शब्दात टीका सुरु केली. तेव्हा कुठल्या तोंडाने गिरीश महाजन यांच्याकडून अपेक्षा करतात. भाजपात काहींचे प्रवेश झाले आहे, त्यावरून आमदार गोटेंनी भाजपवर टीका केली आहे. यावर बोलतांना भामरे यांनी आमदार गोटे यांच्या माध्यमातून प्रवेश झाले असते तर त्यांना गोड वाटले असते. हा प्रवेश पक्षाच्या माध्यामातून झाला त्यामुळे त्यांची जळफळाट होत आहे असा टोलाही मंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी हाणला.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरच्या दुसर्‍या फेजमध्ये धुळ्याची निवड झालेली आहे. यामध्ये रेल्वेच्या दोन्ही बाजूला स्पेशल इकॉनॉमिक झोन मंजुर करण्यात आला आहे. त्या झोनमध्ये जमीन अधिग्रहित करण्यात येत आहे. उद्योजकांना आवाहन करण्यात येते की त्या झोनमध्ये तुम्हाला सवलतीत जमीन दिली जणार आहे. औरंगाबादमध्ये हजारो कोटींचे उद्योग सुरु झाले आहे. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात धुळ्याला काम सुरु होणार आहे. धुळ्यातील एक मोठी इंडस्टी धुळे ते झोडगे दरम्यान उभी राहते आहे. 500 मेगा वॅटचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प विखरण ता. शिंदखेडा येथे केंद्र सरकार कडून मंजूर करुन घेतला जात आहे. त्यामुळे धुळे शहराचा विजेचे प्रश्न सुटणार आहे. अक्कलपाडा धरणातून ग्रॅव्हीटीने धुळे शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो. म्हणून मुख्यमंत्री यांच्याकडे 120 कोटी रुपयांची निधीची मिळवून घेतला आहे. अशा विविध कामांना मंजुरी मिळाली म्हणून आमदार अनिल गोटे यांनी मला लक्ष केले आहे असे मंत्री भामरे यांनी सांगितले.