खोटे दस्तावेजाद्वारे घरावर कब्जा ; चौकशीच्या मागणीसाठी यावलला उपोषण

0

यावल- पूर्वीपारपासून आईच्या नाव ग्रामपंचायतीच्या भोगवटादार म्हणुन असतांना त्या जागेवर खोटे दस्तावेज करून कब्जा करणार्‍यांची चौकशी व्हावी या मागणी करीता हिंगोणा येथील एकाने यावल तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. रहिम कालु तडवी असे उपोषण कर्त्याचे नाव आहे. हिंगोणा गावातील घर क्रमांक 1532 हे पूर्वीपारपासून नयनाबाई कालु तडवी या नावावर होते तर त्यावर रंजनाबाई मोरे यांनी कब्जा केला, असा आरोप तडवींचा आहे तर या कामी खोटे दस्तऐवज ग्रामसेवक व लिपिकाने तयार केले तेव्हा याची चौकशी करून संबधीतांवर गुन्हा दाखल करण्या करीता उपोषण छेडण्यात आले आहे.