खोटे धनादेश प्रकरण ; औरंगाबाद खंडपीठात आता 19 रोजी सुनावणी

0

मुक्ताईनगर- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना अडकवण्यासाठी अंजली दमानिया यांनी कट रचल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी दमानिया यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून मंगळवार, 30 रोजी त्यावर सुनावणी होवून आता खटल्याची पुढील तारीख 19 नोव्हेंबर देण्यात आल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंगळवारी या खटल्याच्या सुावणीकामी मुक्ताईनगरचे नूतन पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी हजेरी लावली. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिसात अंजली दमानिया यांच्यासह इतरांविरुद्ध खोटे धनादेश व बनावट दस्तावेज तयार करून कट रचल्या प्रकरणी दाखल गुन्हा दाखल केला आहे तर हा गुन्हा रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिकेद्वारे केली आहे. मंगळवार, 30 रोजी खटल्याचे कामकाज न झाल्याने पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

तपासाधिकारी बदलल्याने खटल्याकडे लागले लक्ष
अवैध धंद्यांच्या कारवाईचा ठपका ठेवत मुक्ताईनगरचे निरीक्षक अशोक कडलग यांची उचलबांगडी करण्यात आली तर त्यांच्या जागी सुरेश शिंदे यांची बदली करण्यात आली. कडलग यांनी दमानिया यांना अटक करण्यासाठी थेट पोलिस अधीक्षकांकडे परवानगी मागितल्याची चर्चा आहे मात्र त्याबाबत हिरवा कंदील मिळण्यापूर्वीच कडलगांची उचलबांगडी झाल्यानंतर या प्रकरणात आता काय निकाल लागतो? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.