खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देत खंडणीची मागणी ; पाच जणांविरोधात गुन्हा !

Threat to falsely implicate child in Rawer : Crime against five suspects रावेर : भुसावळातील लिंम्पस क्लब रेल्वे कॉर्टरसह रावेरातील रेस्ट हाऊसमध्ये रावेरातील मुलाला डांबून ठेवत मारहाण करून खंडणीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी पाच संशयीतांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा
रावेरा शहरातील नगर पालिकेत सफाई कामगार रवींद्र भिकन छपरीबंद (42, रामदेवबाबा नगर, रावेर) यांच्या मुलाला खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देत संशयीतांनी 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरदरम्यान वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीसह सोनू चावरीया, आकाश, सोनू, पवन यांच्यासह 4 ते 5 अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.