खोट्या प्रतिज्ञाद्वारे फसवणूक : भावाच्या तक्रारीवरून भावाविरुद्धच गुन्हा

भुसावळ : वारस नोंदीतून नाव कमी करण्यासाठी न्यायालयात खोटे साक्षीदार व प्रतिज्ञापत्र सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सेवानिवृत्त कर्मचारी तथा अशोक देवचंद श्रीरामे (71, रा.उमेद बिल्डिंग पांडुरंग टॉकीजजवळ, भुसावळ) यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून त्यांचे बंधू प्रकाश देवचंद शिरनामे (रा.उमेद बिल्डिंग पांडुरंग टॉकीजजवळ, भुसावळ) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार अशोक श्रीरामे यांच्या आई पार्वता देवचंद शिरनामे यांचा जळगावात मृत्यू झाला असताना त्यांचे बंधू प्रकाश देवचंद शिरनामे यांनी न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र व खोटे साक्षीदार उभे करून आईच्या मृत्यूची नोंद भुसावळ नगरपालिकेत केली व या मृत्यू दाखल्याचा वापर सामायीक मिळकत स. नं.3292 अ/51ब मधील पार्वता शिरनामे यांच्या वारस नोंदीतून नाव कमी करत फिर्यादी व न्यायालयाची फसवणूक केली. तपास निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.