भुसावळ- पालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मंगला संजय आवटे यांनी दाखल केलेले शपथपत्र खोटे असल्याची तक्रार सारंगधर महादेव पाटील यांनी प्रांताधिकार्यांकडे काही दिवसांपूर्वी केली होती. या संदर्भात तक्रारदाराचा जाबजबाब घेण्यासाठी 14 जून रोजी पाटील यांना सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. तक्रारदार या दिवशी उपस्थित न राहिल्यास त्यांचे काही एक म्हणणे नाही, असे गृहित धरून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पत्रान्वये प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी बजावले आहे. चिंचकर या प्रकरणात काय भूमिका घेतात? याकडे शहराच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.