खोरीतील निकृष्ट कामांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू

0

निजामपुर । साक्री तालुक्यातील खोरी गावाची विकास कामे निकृष्ठ झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकता मनिषा पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी केली होती त्यानुसार मुख्याधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले असून ग्राम विस्तार अधिकारी भाऊसाहेब वाघ यांना चौकशीसाठी नेमण्यात आले आहे. खोरी गामपंचायत अंतर्गत भुमिगीत गटार, सिमेंट रास्ते ,सभागुह मंङप,अंगनवाङी बांधकाम,उपकेंद संरक्षण भिंत वैयक्तिक सिंचन विहीर, रोजगार हमी योजनाची कामे, पाणी पुरवठाची कामे, तंटामुकत निधी व विविध कामामध्ये मोठा भ्रष्ट्राचार होत असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ती मनीषा पाटील यांनी केली होती . दरम्यान त्यानुसार मुख्याधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान चौकशी अधिकारी वाघ ग्रामपंचायतीच्या दप्ताराची तपासणी व कामाची तपासणी केली असून तपासणी अहवाल जिल्हा परिषेदला सादर करण्यात येणार आहे.यावेळी मनिषा पाटील यांनी सागितले की चौकशी ही क्वालीटी कंट्रोलर मार्फत करण्यात यावी.