निजामपुर । साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील खोरी ग्रामपंचायतच्या विविध विकास कामे, डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक, भुमीगत गटारी, सभागृह, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्यकेंद्र, पाणीपुरवठा, संरक्षण भींत, आदिवासी व दलितवस्ती असे विविध कामे झाले आहे. ही कामे निकृष्ठ दर्जांची झालेली आहे. प्रचंड भ्रष्टाचार झाला असून या सर्व कामांची चौकशी क्वालिटी कंट्रोल मार्फेत करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनिषा पाटील यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी मनिषा पाटील, कैंलास जगंनाथ शिंदे, निंबा नामदेव शिंदे, ज्ञानेश्वर निंबा शिंदे, दगा आनंदराव शिंदे, गुलाब नारायण पाटील, दगा आनंदा बोरसे, संजय गुलाब बच्छाव आदी उपस्थित होते.
विविध कामांचा दर्जा निकृष्ट
14 आगस्टपर्यंत चौकशी झाली नाही तर साक्री पंचायत समिती समोर आत्मदहन करणारण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच खोरी ग्राम पंचायतीचे सदस्य संजय नथथु बोरसे यांनी केलेल्या तक्रारी नुसार खोरी येथील जलयुक्त शिवार, लघु सिचन बंधारेचे बांधकाम होत आहे. बांधकामांत वापरलेले राँ मटेरियल संपूर्ण निकृष्ठ दर्जाचे आहे. बंधर्यांसाठी वापरण्यात येणारी खडी ही विहीरीचे खोदकाम झालेले दगड फोडून वापरण्यात आलेली आहे. सिमेंट निकृष्ठ दर्जाचे आहे. रेती नाल्याची वापरण्यात आलेली आहे. हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जा होत आहे. हे काम इस्टीमेट, वर्क ऑर्डरप्रमाणे काम होत नाही अशी तक्रार केली आहे.