खोरी, भामेर ग्रामपंचायतीच्या निष्कृष्टकामांची चौकशी करा

0

धुळे । साक्रीतालुक्यातील खोरी व भामेर ग्रामपंचायतला शासनाकड़ुन गावाचा विकास कामासाठी मोठ्याप्रमाणात विविध योजने अंतर्गत निधी मिळाली आहे. विकास कामे हे अत्यंत निषकृष्ठ दर्जाचे झाले आहेत यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी खोरी गावाची सामाजिक कार्यकता मनिषा गुलाबराव पाटील यांनी तक्रार जिल्हाधिकारी धुळे याच्याकडे केली आहे. मनिषा पाटील यांनी तक्रार म्हटले की खोरी व भामेर गावात शासनाकड़ुन ग्रामपंचायतला विकास कामासाठी निधी मिळाली आहे. त्यानुसार गावात ग्रामपंचायततर्फे रस्ता डांबरीकरण, शौचालय, पेवहर ब्लॉक रस्ते भुमिगत गटारी, सिमेंट रस्ते, सभागृह मंडप, अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेद्र संरक्षण भींत, पाणी पुरवठाची कामे करण्यात आली आहेत. ही सर्व कामे अत्यंत खराब दर्जाचे बोगस निष्कृष्ठ झाले असून या सर्वांची चौकशीची मागणी केली आहे.

ग्रा.पं.सदस्य, अधिकार्‍यांच्या संगनमताने भ्रष्टाचार
भामेर ग्रामपंचायत ही काँग्रसचे खासदार अशोक गांगुली यांनी आदर्श गांव योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. यामुळे गावाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. यातून अनेक कामे देखील करण्यात आली आहेत. मात्र, या कामांमध्ये ग्रामपंचायत व अधिकार्‍यांनी संगनमत करत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला आहे. अनेक वेळा तक्रार करूनही चौकशी करण्यात येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. खोरी व भामेर ग्रामपंचायतींने केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार मुख्य.कार्यकारी अधिकारी ग्रामविकास मंत्रालय, पालकमंत्री, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केली आहे.