इंदापूर । इंदापूर तालुक्यातील खोरोची या ठिकाणी येणारीएसटी बस वर्षभरापासून बंद आहे. यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना निमसाखर, वालचंदनगर, बारामती या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. इंदापूरआगाराची बस त्वरितचालूकरण्यात यावी, अशी मागणी दादासाहेब भाळे व सूर्यकांत किसवे व परिसरातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी केली आहे. या गावातील व परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी निमसाखर, वालचंदनगर, बारामती या ठिकाणी जातात. विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी खोरोची या ठिकाणी संध्याकाळी एक बस मुक्कामासाठी ठेवण्यात आली होती. यामुळे येथील विद्यार्थ्यांना व नागरिकांना किमान जाण्यासाठी तरी या बसचा उपयोग होत होता. परंतु गेल्या वर्षभरापसूनही बस बंद आहे. यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना 10 किलोमीटर पायी जावे लागते. बस चालू करण्याची मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे.