नवी दिल्ली- अॅगस्टा वेस्टस्टँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या ख्रिश्चन मिशेलला सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याला आज सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले असता ५ दिवसाची कोठडी देण्यात आली आहे.
ख्रिश्चन मिशेलला अटक करण्यात आली तेंव्हा त्याने आघाडी सरकारच्या काळातील कोणत्याही मंत्र्याने आर्थिक लाच घेतली नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान त्याची आता चौकशी केली जाणार आहे.