ख्रिश्‍चन कौन्सिलवर साळवे यांची निवड

0

हडपसर । असोसिएशन ऑफ इंडिया ख्रिश्चन कौन्सिलच्या राज्य वर्किंग कमिटी अध्यक्षपदी बाळासाहेब साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशन ऑफ इंडिया ख्रिश्चन कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये ही नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र असोसिएशन ऑफ इंडिया ख्रिश्चन कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. हनोक यांनी दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष विशाल मोरेशो निराप चांदेकर, फादर पीटर जॉर्ज, फादर योहान ओहोळ, सिमोन रुपटक्के, संजय भोसले, फ्रन्सिस सोनवणे, प्रा. अरविंद सांगळे आदी उपस्थित होते.