जळगाव। जवळपास वर्षभरानंतर भुसावळ शहरात पुन्हा मोठ्या गुन्हेगारीने डोके वर काढले असून शहरात गँगवार सक्रिय होत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 25 रोजी रात्री हद्दपार असलेल्या युवकांनी गोळीबार केल्याने दोन जण जखमी झाले आहेत. रात्रीच त्यांना जळगावातील खाजगी रूग्णालयात दाखल करून जखमी भावापैकी एकावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पायात रुतलेली गोळी काढण्यात आली आहे.
प्रभात कॉलनीत जमलेले ‘ते’ कोण?
काल रात्री भारतनगर येथे निखील किशोर झांबरे हा त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर उभा होता. मुकेश भालेराव, रानु बॉक्सर,गौरव बढे मोटरसायकलने जात असताना त्यांनी निखीलला लाथ मारली. वादावादी व गोंधळ पाहून त्याचा लहान भाऊ सुमित हा बाहेर आला घडलेला प्रकार पाहून ही कोण मुलं आहेत म्हणून त्यांचा शोध दोघाभावांनी घेतला असता, प्रभात कॉलनीतील मोकळ्या जागेत तीन युवक दिसले. परंतु प्रत्यक्षात तेथे जवळपास 8 ते 9 लोक होते. सुमित हा त्यांच्यातील गौरव बढेशी बोलत असतांना त्याचवेळी निखीलच्या डोक्यावर वार करण्यात आला. मारामारीत निखीलच्या डाव्या पायाच्या मांडीत गावठी कट्ट्यातून चालवलेली गोळी लागली व डोक्यावर फरशी मारण्यात आली. सुमित निखीलला वाचविण्यासाठी सरसावला असता त्याच्यावर खंजरने हल्ला करण्यात आला.या जखमींना मध्यरात्रीच जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.