गंगापुरीच्या युवकाचा खून : मृतदेह गारखेडा खुर्द परीसरात नर्सरीजवळ फेकला

जामनेर : जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील श्याम फकीरा ठाकरे (35) या युवकाचा खून करून मृतदेह जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द परीसरातील नर्सरी शिवारात फेकल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा
श्याम ठाकरे हा तरुण पत्नी विद्या ठाकरे (27) सह गंगापुरी येथे वास्तव्यास होता. शेतीचे काम करून दाम्तप्य उदरनिर्वाह करीत होते मात्र 24 जून रोजी श्याम हा सकाळी आठ वाजता कामासाठी बाहेर पडला मात्र घरी परतलाच नाही तर 24 रोजी सकाळी आठ ते 25 जून रोजीच्या दुपारी तीन वाजेदरम्यान अज्ञाताने श्याम ठाकरे यांचा खून करून मृतदेह गारखेडा खुर्द, ता.शिवारातील नर्सरी परीसरात फेकून पळ काढला. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी मयताची विद्या श्याम ठाकरे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करीत आहे.