गंगापुरी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

0

मटण पुरवठादाराकडून 15 हजारांची मागणी भोवली ; आश्रमशाळा कर्मचार्‍यांमध्ये खळबळ

जळगाव- जामनेर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापक शांताराम सोनू सोनवणे (50, रा.प्लॉट नं.29/2, शिव कॉलनी, जामनेर) यांना मटण पुरवठादाराकडून 15 हजारांची मागणी केल्याप्रकरणी शुक्रवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने आश्रमशाळा कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुरवठादाराकडून पैशांची मागणी ; अहवालानंतर कारवाई
गंगापुरी आश्रमशाळेत 38 वर्षीय ठेकेदाराने मटणाचा पुरवठा केला होता शिवाय हे बिल काढण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम सोनवणे यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी 27 सप्टेंबर 2018 रोजी केली होती शिवाय तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. जळगाव एसीबीने आरोपीवर कारवाईबाबत एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याकडे परवानगी मागितली होती. गुरुवारी आरोपीला अटक करण्याबाबत निर्देश मिळाल्यानंतर शुक्रवारी एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नीलेश लोधी व सहकार्‍यांनी आरोपी मुख्याध्यापकास अटक केली. आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे असल्याने आरोपीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.