स्व.मोहन बारसे स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम
भुसावळ- माजी नगरसेवक स्व.मोहन बारसे (पहेलवान) यांच्या स्मृतीदिनानिमित्त मंगळवार, 3 जुलै 2018 रोजी सकाळी 11 वाजता येथील गंगापुरी, ता.जामनेर येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान तसेच व विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने शाळेला थंड पाण्याचे वॉटर कुलर भेट देणार आहे. यावेळी आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, नगरसेवक, पदाधिकारी, माजी नगरसेवक संतोष बारसे, नगरसेविका सोनी संतोष बारसे, कौशल्याबाई बारसे, धीरज किशोर बारसे (भुरा) आदींची उपस्थिती राहणार आहे.