A Youth from Bhusawal Died in A Two| Wheeler Accident भुसावळ : जामनेर येथून भुसावळकडे परतत असताना गंगापुरी गावाजवळ शनिवारी सायंकाळी दुचाकीला झालेल्या अपघातात शहरातील पंचशील नगरातील युवक हिमांशू सुनील चौधरी (18) या युवकाचा रविवारी उपचार घेत असतांना मृत्यू झाला. तरुणाची डॉक्टर होण्याची इच्छा अपूर्णच राहिली. विशेष म्हणजे सुनील चौधरी यांचा हिमांशू हा एकुलता एक मुलगा होता.
एकूलत्या एक मुलाचा मृत्यू
हिमांशू चौधरी हा शहरातील पंचशील नगरातील रहिवासी आहे. त्यांने नुकतीच बारावीची परीक्षा देऊन तो पास झाला होता. त्याला दंत्तरोग चिकीत्सक (दातांचा डॉक्टर) व्हायचे असल्याने त्याने नुकतीच नीटची परीक्षा दिली होती. तो शनिवारी सकाळी जामनेर येथे गेला होता. तो तिकडून येण्यासाठी सायंकाळी निघाला होता. येतांना त्याची मोट सायकल जामनेर येथे नादुरूस्त झाली होती. त्यावेळी त्याने वडील सुनील चौधरी यांना फोन करून गाडी खराब झाल्याची माहिती दिली. त्यामुळे वडीलांनी गाडी जामनेर येथेच लावून देत सांगत बस अथवा अन्य वाहनाने निघून ये असे सांगितले, मात्र हिमांशू याने गाडी सुरू करून त्याच गाडीवर भुसावळ कडे येण्यास निघाला होता. जामनेरहुन भुसावळकडे येत असतांनाच त्याच्या मोटरसायकलला गंगापुरीजवळ अपघात झाला. तो जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात तेथे पडला होता. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्याला गंगापुरी येथील काही जणांनी ओळखले त्यांनी तत्काळ त्याला जामनेर येथील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. नेमका अपघात कश्याचा झाला हे मात्र कळू शकले नाही. जामनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
भुसावळात आणून केले दाखल
भुसावळ येथे हिमांशूच्या अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या वडीलांसह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, विनोद सोनवणे, अशोक चौधरी, संघदीप नरवाडे, राजू डोंगरदिवे आनंद सपकाळे आदी जामनेरकडे रवाना झाले. तेथून जखमी हिमांशूला भुसावळ येथे आणून त्याला उपचारार्थ हॉस्पीटललला दाखल केले. तेथे उपचार सुरू असतांना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
चौधरी कुटुंबाचा एकुलता मुलगा
सुनील चौधरी यांचा हिमांशू हा एकुलता एक मुलगा होता. हिमांशू याचे वडील इलेक्ट्रीक वस्तू दुरूस्तीचे कामे करतात. हिमांशू याने नाहाटा कॉलेजमधून बारावी पास केले होते. घरची परिीस्थिती जेमतेम असल्याने डॉक्टर होऊन कुटुंबाला मदत करण्याची त्याची इच्छा होती, ती अपूर्णच राहिली. त्याच्यावर रविवारी रात्री तापी काठावरील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.