गच्चीवर तरूण झोपलेले पाहून चोरट्याने लांबविले तीन मोबाईल

0

जळगाव । घराच्या वरच्या मजल्यावरील बांधकाम सुरू असल्याने गच्चीवर ठेवलेली पाण्याची मोटार गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्यामुळे शनिवारी रात्री चार तरूण घराच्या गच्चीवर झापले होते. मात्र, मध्यरात्री गाढ झोपेत असतांनाच चोरट्यांनी तरूणांची तीन महागडी मोबाईल चोरून नेली. ही घटना पार्वतीनगरात घडली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तरूणांनी तक्रार दाखल केली आहे.

सकाळी 6 वाजता मोबाईल चोरीला गेल्याचे आले लक्षात
पार्वतीनगरातील सदाशिव मुलमुले यांच्या घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे ते कुटूंबियांसह समोरच्या घरात भाड्याने राहतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकाम सुरू असलेल्या घराच्या गच्चीवर ठेवलेली पाण्याची मोटार ही चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यामुळे आणखी काही साहित्य चोरीला जावू नये यासाठी सदशिव मुलमुले यांचा मुुलगा ज्ञानेश्‍वर हा त्यांच्या मित्रांसह घराच्या गच्चीवर झोपायला जात होते. शनिवारी रात्री देखील ज्ञानेश्‍वर हा त्याचे मित्र राहुल सोनार, ललित राजेंद्र राजपुत, शुभम सदावरते यांच्यासह गच्चीवर झोपण्यासाठी गेले. रात्री गप्पा मारल्यानंतर रात्री 1 वाजता चौघांपैकी तिघांनी आप-आपले मोबाईल उशीच्या बाजूला ठेवून झोपून गेले. त्यानंतर मध्यरात्री घराचे बांधकाम सुरू असल्याने गच्चीवर जाण्यासाठी जिन्याला दरवाजाच नसल्याने चोरट्याने हिच संधी साधत तिन महागडे मोबाईल चोरून नेले. रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास शुभम याला जाग आल्यानंतर त्याला त्याचा मोबाईल दिसून आला नाही. त्याने इतरांना उठवून मोबाईलची विचारपूस केली असता राहूल व ललित यांचा मोबाईल देखील चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर सोमवारी तरूणांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठत मोबाईल चोरीबाबत तक्रार दाखल केली आहे.