गजानन महाराज अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

0

श्रींच्या रजत मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा

नवी सांगवी : श्री संत गजानन महाराज शेगांव यांच्या 140 व्या प्रकट दिनानिमित्त जुनी सांगवी येथील श्री गजानन महाराज मंदिरात श्रींचा रजत मुखवटा प्राणप्रविष्ठा व गजानन महाराज अखंड हरिनाम व कीर्तन सप्ताहाला गुरूवारपासून सुरुवात झाली. हा सोहळा 8 फेब्रुवारीपर्यंत संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवारी महाप्रसादाचे आयोजन !
पहिल्या दिवशी सायंकाळी पंडित केशव गिंडे यांचे शिष्य अझरुद्दीन शेख यांचे मधुर बासरी वादन झाले. रविवारी चैत्राली अभ्यंकर आणि सहकलाकार यांचा गोल्डन मेमरी प्रस्तुत भक्तीभाव तरंग हा भक्ती संगीताचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे. त्यानंतर श्रींची आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी माधवी देसाई व सहकलाकार यांचा भावभक्ती धारा हा कार्यक्रम होईल. गुरूवारी सकाळी काल्याचे किर्तन व त्यानंतर काल्याचा महाप्रसाद हाईल. सायंकाळी श्रींची पालखी दिंडीची नगर प्रदक्षिणा सप्ताह सोहळ्याची सांगता होईल.

दररोज रात्री किर्तन सेवा!
या हरिनाम सप्ताह सोहळ्यात दररोज रात्री किर्तन सेवा होणार आहे. ह.भ.प. आबा महाराज गोडसे शिरुर व ह.भ.प. बाबुराव तडसे पुसद यांनी गेले दोन दिवस किर्तन सेवा सादर केली. शनिवारी ह.भ.प. महंत पुरूषोत्तम महाराज पाटील आळंदी, रविवारी ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे मुक्ताईनगर, सोमवारी ह.भ.प. सुदाम महाराज शास्त्री पिंपळे-गुरव, मंगळवारी ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे मांडवी, बुधवारी ह.भ.प. विश्‍वनाथ महाराज कोल्हे दिंडोरी तर गुरूवारी सकाळी ह.भ.प. नितीनदासजी महाराज मलकापूर हे किर्तन सादर करणार आहेत. या सोहळ्यानिमित्त दररोज काकडा आरती गाथा भजन ज्ञानेश्‍वरी पारायण, महिला भजन, हरिकिर्तन, हरि जागर हे कार्यक्रम दररोज चालू आहेत. तरी सर्व भक्त, भाविक, संत आणि नागरिकांनी या सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व विश्‍वस्त व सेवेकरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.