गटविकास अधिकार्‍यांकडे मांडली घरकुलांची कैफियत

0

नंदुरबार । बेघरपासून वंचित असलेल्या नंदुरबार तालुक्यातील हाटमोहीदे येथील आदिवासी टोकरे कोळी कुटुंबीयांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन कैफियत मांडली, या वंचित कुटुंबातील लाभार्थ्यांना ड यादीत समाविष्ट करून घरकुल मिळून देण्याचे आश्वासन गटविकास अधिकार्‍यांनी दिलं आहे.

या गावात आदिवासी टोकरे कोळी समाजाची दिड शे कुटुंब आहेत,शासनाच्या निकष म्हधे बसत असताना ही या कुटुंबातील लाभार्थ्यांना सात वर्षा पासून बेघर योजनेचा लाभ मिळालेला नाही,यामुळे ही कुटुंब शासन योजनेपासून वंचित होते,ग्रामपंचायत स्थरावर देखील न्याय मिळत नसल्याने या लोकांनी दि 22 आगस्ट रोजी पंचायत समितीत धडक मारली,गटविकास अधिकार्‍यांना कैफियत मांडून वस्तू स्थिती सांगितली,या लाभार्थ्यांना ड यादीत सामावून घेण्याचे आश्वासन दिल्याने समाधान व्यक्त करण्यात आले,