गटसचिव संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

0

पाचोरा । जिल्ह्याभरातील गटसचिवांना मिळणार तटपुजे वेतनही वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर उदनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या करिता विविध मागण्यासाठी गटसचिव संघटनेतर्फे आमदार किशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले. मागण्यामान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्याभरातील गटसचिवांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, पुणे औद्योगिक न्यायालयाच्या आदेशान्वये राज्यभरातील गटसचिवांना ग्रामसेवक समान वेतन देण्यात यावे, गटसचिवांचे थकीत वेतन व इतर देयक विना विलंब अदा करावे, गटसचिवांची यंत्रणा जितल्हा स्तरीय समितीकडे वर्ग करुन गटसचिव सेवा व वेतन विषयक बाबींचे नियोजन करावे, कृषी कर्ज माफी योजनेतुन थकीत संयुक्त पगार वर्गणी जिल्हा स्तरीय समितीस वसुली करुन देण्यात यावी यासह