घाटकोपर : पश्चिम हिराचंद देसाई रोडच्या घाटकोपर स्थानकाकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या फुटपाथवरील गटाराचे झाकण उघड्यावर असल्याने शाळकरी मुलांचा जीव धोक्यात आहे. या फुटपाथवरील दोन ते तीन गटाराचे झाकण उघडे असल्याने या फुटपाथ वरून शाळा सुटताना वा भरताना लहान मुले फुटपाथवरून चालतात. गटारचे झाकण उघडे असल्याने मुलांचा गटारात पडून जीव धोक्यात जाऊ शकतो. पालिकेने लवकरात लवकर गटारावर झाकण टाकावे अशी मागणी पालक वर्ग करत आहे.
दरम्यान मुंबईत ठिकठिकाणी गटारांची झाकणे उघडी असतात. काही ठिकाणी झाकणे तुटलेली असतात, तर काही ठिकाणी झाकणे चोरलेली असतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला कायम धोका निर्माण झालेला असतो. म्हणून त्यातील झाकणे दुरुस्त करण्यावर महापालिकाने तत्परतेने कारवाई करणे गरजेचे असते. मात्र महापालिका त्यासाठी प्रयत्न करतांना दिसत नाही. अनेकदा खोल गटारांच्या झाकणांचीही दूरवस्था झालेली असते. त्याठिकाणची स्थिती अधिक गंभीर झालेली असते.