नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान आज बुधवारी ३० त्यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती दिली आहे. दोन आठवड्यांपूर्वी नितीन गडकरी यांना करोनाची लागण झाली होती. स्वत: नितीन गडकरी यांनी आज त्यांच्या टि्वट करून माहिती दिली आहे.
मुझे आप सभी को यह बताते हुए बहुत प्रसन्नता हो रही है कि आप सभी के आशीर्वाद और शुभकामनाओं के बल पर मैं कोरोना से ठीक हो चुका हूं। आपके स्नेह के लिए धन्यवाद।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 30, 2020
“तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी करोनामधून पूर्णपणे बरा झालो आहे” असे नितीन गडकरी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी नितीन गडकरी यांनी स्वत: ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी स्वत: विलगीकरणात गेले होते.