गडकरींचा पुतळा शिवसेनेने काढला होता तेव्हा कुठे होतात?

0

विश्‍ववंद्य शिव-शंभूची अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करणार्‍या राम गणेश गडकरीचा पुतळा काढल्यानंतर नटश्रेष्ठ पुष्कर क्षोत्री (बावचळू नका भारतातलेच नाव आहे) आणि नटवर्य प्रसाद ओक (काय? हा कोणता नट आहे ठाऊक नाही? कमाल आहे) हे रस्त्यावर उतरलेत. (यांच्यापेक्षा रस्त्यावरच्या नटाला जास्त किंमत असते हा भाग वेगळा) काय तर म्हणे पुतळा परत बसवल्याशिवाय पुण्यात काम करणार नाही. म्हणजे यांना काम भेटतात, तर प्रश्‍न असा आहे की, काही वर्षांपूर्वी शिवसेनेने हाती असलेल्या सत्तेच्या जोरावर मुंबईतील एका रस्त्यावरचा रा. ग. गडकरीचा पुतळा रातोरात काढला. विनापरवाना काढला आणि त्या ठिकाणी विश्‍ववंदनीय माँ साहेब मातोश्री (या माँ साहेब म्हणजे जिजाऊ माँ साहेब नव्हेत) मीनाताई ठाकरे यांचा पुतळा बसवला. तेव्हा कुणाच्या बुडालाही खबर लागली नाही. ना कोणी नाटक न करण्याची धमकी दिली. ना कोणी अग्रलेख लिहिले. पण काल परवा पुण्यात हाच प्रकार घडला तर जणू काही जगबुडी आल्यागत हाकाटी उठली आहे.

प्रश्‍न असा आहे की, शिवसेनेने हाच प्रकार केला तेव्हा या लोकांनी असा निषेध का नाही केला? अग्रलेख तर सोडा साधी बोटभर बातमीही छापण्याची तसदी वृत्तपत्रवाल्यांनी घेतली नाही, असा दुटप्पीपणा का?

ज्या उद्यानाचा आणि गडकर्‍याचा काहीही संबंध नाही. उलट संभाजीराजेंची अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बदनामी केली, त्या व्यक्तीचा पुतळा संभाजी महाराज नावाच्या उद्यानात बसवणे हा समस्त बहुजनांचा घोर अपमान आहे. उद्या कोणी म. गांधी उद्यानात जर गोडसेचा पुतळा बसवला, तर काय बरे होईल? तो गांधींचा अपमान ठरणार नाही का? तुकोबांच्या मंदिरात मंबाजी भटाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, तर हाडाचा वारकरी हे सहन करेल का? कदापि नाही. त्याच भावनेतून गडकरीचा पुतळा प्रकरण घडले आहे.

याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत हास्यास्पद आहे. ब्रिगेडच्या पोरांना ज्ञान सांगण्याअगोदर उद्धव साहेबांनी आपल्या मातोश्रीचा पुतळा काढून गडकर्‍यांचा पुतळा बसवावा. राज ठाकरेंची अवस्था तर अजून वाईट आहे. उरलेला एकमेव आमदार सोडून गेल्यानंतर व धर्मपत्नीस श्‍वानदंश झाल्यानंतर राजसाहेब सैरभैर झाले आहेत. त्यांना स्वजातीतील कोण्याही लुंग्यासुंग्याचे स्मारक चालते, यांना शिसारी येते ती शिवरायांच्याच स्मारकावेळी. तेव्हा महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यांना खर्‍या खोट्याची जाणीव होत आहे. महाराष्ट्राला आता कोणीही फसवू शकत नाही.
कुणाचाही पुतळा काढला की, हे आम्हाला बापाच्या जागी होते, ते आम्हाला चुलत्याच्या जागी होते, फलाने फलाने तर हुबेहूब माझे आजोबाच होते अन् गोडसे तर माझा सख्खा भाऊच होता अशा प्रकारचा राग आळवणे सुरू होते. माझा प्रश्‍न एकच आहे की आम्ही जात, धर्म, पंथ मानत नाही म्हणता आणि केवळ एखाद्याचा निषेध केला की रस्त्यावर उतरता. आरे महाराष्ट्राच्या लोकांना तुम्ही समजता तरी काय? एखादा टुक्कार नाटककार जर तुमच्यासाठी बाप, भाऊ, बहीण ठरत असेल, तर छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे, माँ साहेब जिजाऊ, म. फुले, सावित्रीमाई, राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आमच्या बाप, भाऊ, बहिणीपेक्षाही ग्रेट आहेत. तेव्हा बहुजनांच्या अस्मिता पुरुषांचा अवमान करणे थांबवा. संभाजी उद्यानात तत्काळ राजे संभाजींचा पुतळा बसवावा. काढून टाकलेला गडकर्‍याचा पुतळा त्या पुष्कर क्षोत्रीला किंवा प्रसाद ओकला भेट देऊन टाकावा. त्यांनी या थोर नाटककाराचा पुतळा आपल्या परसबागेत लावावा (सारसबागेत नव्हे) आणि त्यांच्या समोर नतमस्तक होत दररोज नाटकाची तीन खेळ करावेत, (टीप : रा. ग. गडकरीची जात कोणती आहे याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. त्याने शिवरायांची, संभाजीराजेंची बदनामी केली हे त्रिवार सत्य आहे. ज्याच्या मनात जे पाप असते तो त्या जातीचा ठरतो. कारण तुकोबा म्हणतात- ज्याचा संग चित्ती। तुका म्हणे तो त्या याती॥ या तत्त्वानुसार रा. ग. गडकरीची एकच जात आहे, ती म्हणजे शिवद्रोह्याची)

डॉ. बालाजी जाधव,

औरंगाबाद. 9422528290