नागपूर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे हिंगोलीतील काँगे्रस खासदार राजीव सातव यांनी शनिवारी दुपारी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
गडकरी-सातव भेटीचे वृत्त समजताच राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली. दरम्यान, मतदारसंघातील विकासकामांसाठी गडकरींची भेट घेतल्याचे सातव यांनी म्हटले आहे. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याने या भेटीनंतर अनेक राजकीय तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. तर गडकरी यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत, सातव-गडकरी भेटही अशीच असणार असे काही राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे.