मुंबई: गडकिल्ले भाड्याने देऊन तेथे लग्न, समारंभाला परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला जोरदार विरोध होतो आहे. विरोधक अक्षरश: सरकारवर तुटून पडले आहे. दरम्यान सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात वर्ग १ आणि वर्ग २ अशा संवर्गात किल्ल्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. वर्ग १ मध्ये शिवराय यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग १ मध्ये येतात आणि अन्य जवळपास ३०० किल्ले हे वर्ग २ मध्ये येतात. वर्ग २ चे किल्ले असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे किल्ले लग्नसाठी, समारंभासाठी देण्याचा प्रश्न नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. माध्यमातील बातमीचे चुकीचे अर्थ काढले जात असल्याचे स्पष्टीकरण पर्यटन विभागाचे सचिव विनिता सिंगल यांनी दिले आहे.