गडचिरोली – आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यातच गडचिरोलीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून परत येताना डोंगर मेंढा गावानजीक ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाला, यात 3 जण ठार तर 9 जण गंभीर जखमी झाले आहे. मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरमधून दहा ते बारा जणांना शंकरपूर मतदान केंद्रावर नेण्यात येत होते. मात्र मतदान झाल्यानंतर पुन्हा घरी परतताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे.
जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.