मुंबई: गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ महाराष्ट्र दिनी १ में रोजी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा आज शुक्रवारी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी केली.
विधान परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान सुरक्षेचे नियम पळाले गेले नाही त्यामुळे १५ जवानांचे जीव गेले, त्याला पोलीस उपअधीक्षक जबाबदार असल्याचे आरोप मुंडे यांनी केले. यावरून ही कारवाई करण्यात आले. या नक्षलवादी हल्ल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती, त्याचा अहवाल प्राप्त असून येत्या दोन दिवसात त्यावर निर्णय होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असे गृहराज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले.