गडचिरोली महामॅरेथॉन ग्रँड सक्सेसफुल, प्रचिती मीडिया जळगावचे सचिन घुगे सन्मानित

जळगावातील प्रसिद्ध जाहिरात संस्था व मॅरेथॉन व्यवस्थापनाचा मोठा अनुभव असलेली प्रचिती मीडियाचा 'सिंहाचा वाटा आहे

जळगाव – एरवी नक्षली कारवायांच्या बातम्यांनी चर्चेत असलेले गडचिरोलीने अभिमानास्पद उपक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले .गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने , आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानास्तव ५ मार्च २०२३ रोजी भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस दलातर्फे झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला . जिल्हाभरातील दुर्गम अतिदुर्गम भागातील समाजाच्या सर्वच स्तरातून आबालवृद्धांचा सुमारे१२ हजार

धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला . या उपक्रमाच्या या अभूतपूर्व यशात जळगावातील प्रसिद्ध जाहिरात संस्था व मॅरेथॉन व्यवस्थापनाचा मोठा अनुभव असलेली प्रचिती मीडियाचा ‘ सिंहाचा वाटा आहे. या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी प्रचिती मीडिया यांच्याकडे सोपविण्यात आली होती . जळगाव ते गडचिरोली हे प्रचंड अंतर असतांनाही प्रचिती मीडियाने हे आव्हान लीलया पेलले. स्पर्धकांना द्यावयाचे बिब्स , मेडल्स , टी शर्ट , सर्टिफिकेट्स , मॅरेथॉन किट, ट्रॉफीज यासारख्या सगळ्याच बाबी अतिशय उच्चतम दर्जाच्या व अचूक वेळेत प्रचितीने उपलब्ध करून दिल्यात . स्पर्धेचे मैदानातील व संपूर्ण शहरातील सर्व प्रकारचे डिझाइन्स , कट आउट्स , प्रिंटिंग संपूर्ण गडचिरोली वासियांचे लक्ष वेधून घेत होते . अतिशय आव्हानात्मक असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनात प्रचिती मीडियाचे संचालक सचिन घुगे व त्यांच्या टीमने स्वतःला झोकून दिले होते. गेले अनेक दिवस व रात्र प्रचिती मीडियाचे एकच मिशन होते ते म्हणजे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील हि महामॅरेथॉन ऐतिहासिकरित्या संपन्न करणे आणि प्रचितीने ते करून दाखविले. या महत्वपूर्ण योगदानाबद्दल प्रचिती मीडियाचे सचिन घुगे यांचा श्री. संदीप पाटील, सर (IPS) पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्री. नीलोत्पल सर, (IPS) पोलिस अधीक्षक,गडचिरोली, श्री. प्रविण साळुंके, सर (IPS), अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती) महाराष्ट्र, मुंबई. श्री संजय मीना सर, जिल्हाधिकारी, गडचिरोली, श्री. कुमार चिंता सर (IPS)अप्पर पोलिस अधिक्षक, प्रशासन, श्री. कुमार आशिर्वाद, सी. ई. ओ., गडचिरोली, श्री. अनुज तारे, अप्पर पोलिस अधिक्षक, अभियान, श्री. यातीश देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक, अहेरी, श्री. मैनक घोष, एस. डी. ओ., गडचिरोली, श्री. शुभम गुप्ता, एस.डी.ओ.,एटापल्ली, श्री. अंकित, एस. डी.ओ, अहेरी इत्यादी अधिकारी व आमदार , मोठे उद्योजक मान्यवर उपस्थित होते. मॅरेथॉन आयोजनाचा असलेला गडचिरोली पोलिसांचा उद्देश्य प्रचिती मीडियाच्या काटेकोर नियोजनाने संपूर्णपणे सफल झाला हे निश्चित. नक्षलींच्या दहशतीतून गडचिरोलीतील आदिवासी बाहेर पडत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. या उत्कृष्ट नियोजनामुळे पुढील वर्षाच्या मॅरेथॉनची आतापासून ओढ लागल्याची प्रतिक्रिया असंख्य स्पर्धकांनी व्यक्त केली.