गडद येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृत्यू

0

चाकण – घरात कोणाला काही न सांगता खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गडद ( ता. खेड ) येथून गेल्या आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या बावन्न वर्षीय महिलेचा आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व पोलीस हवालदार अनिल जगताप यांनी दिली.

चिंधूबाई ज्ञानदेव तळेकर ( वय – ५२ वर्षे, रा. गडद, ता. खेड ) असे बेपत्ता झाल्यानंतर मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती ज्ञानदेव बापू तळेकर ( वय – ५४ वर्षे, ) यांनी चिंधूबाई ह्या घरात कोणाला काही न सांगता राहत्या घरातून दि. २१ जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान निघुन गेल्या आहेत. तेव्हापासून त्या परत घरी आल्या नसुन, अद्याप बेपत्ता आहेत. अशी फिर्याद दिली होती. तेव्हापासून येथील पोलीस व चिंधूबाई यांचे नातेवाईक त्यांचा सर्वत्र शोध घेत होते. शोध सुरु असताना चिंधूबाई यांचा मृतदेह गडद गावातच एका निर्जन स्थळी मिळून आला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून, येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.