पिंपरी – भाजप सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार महाराष्ट्रातील 25 गड किल्ले लग्न आणि इतर सोहळ्यासाठी भाडयाने देण्यात येणार आहेत. या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शनिवारी डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय लवकरात लवकर मागे घेऊन संबंध महाराष्ट्राची माफी मागावी. अन्यथा भाजपच्या कुठल्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृ्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. शैलेश मोहिते, प्रदेश संघटक विशाल काळभोर, माजी नगरसेवक सतीश दरेकर, राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, कार्याध्यक्ष योगेश गवळी आदी आंदोलनात सहभागी होते.