गढूळ पाणी हे तर तत्कालीन सत्ताधार्‍यांचे पाप

0

नगराध्यक्ष रमण भोळे : प्रसिद्धीसाठी आंदोलने

भुसावळ- शहराला होणारा पाणीपुरवठा गढूळ असल्याबाबत वावटळ्या उठवल्या जात आहेत मात्र गढूळ पाणीपुरवठा हे तत्कालीन सत्ताधार्‍यांचे पाप असून त्या काळात कुठल्याही उपाययोजना न झाल्याने आज हा नागरीकांना त्रास सोसावा लागत असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करून नगराध्यक्षांना गढूळ पाणी पाजण्यात आले, असे काही लोक शहरात सांगून समाजाची दिशाभूल करीत आहेत वास्तविक हे पाणी पिण्यायोग असून आपल्या घरातही तेच पाणी येते आम्ही ते पाणी पितो, असे नगराध्यक्ष म्हणाले.

आपल्या घरीदेखील तेच पाणी येते -नगराध्यक्ष
मंगळवारी काही पदाधिकारी नगरपालिकेत आले आणि त्यांनी गढूळ पाणी स्वतः पिऊन नगराध्यक्षांना ते पाणी पिण्याची विनंती केली तेव्हा आपण त्यांना संपूर्ण शहरात अशा पद्धत्तीने पाणी येत असलचे सांगून माझ्या घरीदेखील हेच पाणी येते व हे पाणी पिण्यात मला कुठलीही अडचण नाही, असे सांगून ते पाणी मी पिलो मात्र नगराध्यक्षांना गढूळ पाणी पाजण्यात आल्याची काही जण विनाकारण बदनामी करीत असल्याचे नगराध्यक्ष भोळे म्हणाले.

कालबाह्य यंत्रणेची डोकेदुखी : अमृतातून मिळणार दिलासा
गढूळ पाण्याचा प्रश्न मागील 12 वर्षांपासून भुसवळच्या जनतेला भेडसावत आहे परंतु ज्या काळात पाण्याला फिल्टर करण्याच्या यंत्रणेची काळजी घ्यावयाची होती तेव्हा मागील सत्ताधार्‍यांनी याा जनतेच्या महत्वाच्या समस्येबद्दल सपशेल दुर्लक्ष केले व पूर नसताना सुद्धा त्या काळात गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. खरेतर ही यंत्रणा 15 वर्षांआधीच कालबाह्य झाली आहे आणि आम्ही सत्तेत आल्यावर ह्या विषयावर तत्परता दाखवून अमृत योजना मंजूर करून आणली व कामदेखील सुरू केल.े येत्या काळात हा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. मात्र मागील सत्ताधार्‍यांचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा ह्यामुळे आपणास आज हा त्रास सहन करावा लागत आहे आता ही समस्या निकाली लावण्यासाठी नगरपालिका सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे लवकरच हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.