गणपती अथर्वशिर्षाचे केले सामुहिकरित्या पठण

0

भुसावळ। प्राचीन श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात सुरु असून सकाळी 6 ते 8 अभिषेक, पुजा व आराधना तसेच 9 ते 11 प्रवचन व 2.30 ते 5 व्याख्यान, सायंकाळी 6 ते 8 कीर्तन, भक्तिगीते असे दैनंदिन कार्यक्रम होत आहे. येथील चिंतामणी गणेश मंडळातर्फे अथर्वशिर्षाचे पठण करण्यात आले व महाआरती होवून प्रसाद वाटप झाले. श्रीराम चौक व सरिता चौक यांनी मनोगत व्यक्त केले. चिंतामणी मंडळातर्फे मंदिर पुनर्वसनासाठी 51 हजार रुपये देण्याचे घोषीत केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगरसेवक प्रा. दिनेश राठी, भारती राठी, शुभांगी राठी, जे.बी. कोटेचा, अ‍ॅड. गणेश यावलकर, रामभाऊ कुळकर्णी, अमृत ढाके, बाबुराव पाचपांडे, काशिनाथ महाजन, बंडू कुळकर्णी, उमाकांत जोशी उपस्थित होते.