नातेवाईकांकडे लग्नसमारंभाला होते गेले
जळगाव :- शहरातील गणपतीनगर परिसरातील सुमन रेसिडेन्सी मध्ये बंदघराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोने चांदिच्या ऐवजासह रोकड लंपास केली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झााला आहे. जळगाव शहरातील गणपतीनगर परिसरातील सुमन रेसिडेन्सी सुरचना प्लॉट भागातील (प्लॉट नं.1) महाराष्ट्र बँकेतून सेवानिवृत्त अधिकारी राहुल चिंतामण जगदे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. 20 रोजी राहुल जगदे पत्नी नेहा यांच्यासह धुळे येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. लग्नसोहळा आटोपून जगदे कुटूुंबीय 1 डिसेंबर रोजी घरी परतले. बंद घराचा कडीकोयंडा तोडलेला आढळून आला, घरात गेल्यावर, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले, कपाट तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. चोरी झाल्याची खात्री झाल्यावर रामानंद पोलिसांना घटनेची माहिती दिली.
75 हजाराची मंगळपोत लंपास
जगदे यांच्या घरातील स्वयंपाक घरा पासुन ते बेडरुम पर्यंत संपुर्ण घर चोरट्यांनी उलथापालट करुन ठेवले होते. घरात इरत्र चिल्लर रोकड सापडली तर भिंतीवर टांगलेल्या पिशवीत नेहा जगदे यांची अडीचग्रॅम वजनाची 75 हजार रुपये किंमतीची मंगळपोत चोरट्यांनी लंपास केली आहे. पोलिसांनी जगदे यांच्या घरी येवुन पहाणी केल्यावर ठसे तज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. जगदे यांच्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलिसांत अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. .