नंदुरबार । ‘गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या, ’श्री’च्या नावाचे जयघो करीत, ढोल ताशांच्या तालावर नाचत लाडक्या गणरायाला भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. शहरात तब्बल 17 तास विसर्जन मिरवणुका चालल्या. जळका बाजारात झालेली मानाचे दादा व बाबा गणपतींची हरिहर भेट सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. 11 दिवसांच्या मुक्कामाला आलेल्या गणरायाला अनंत चतुर्थीला मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी निरोप देण्यात आला. सकाळ पासूनच घरगुती श्रींच्या विसर्जनाची घरोघरी लगबग दिसून आली. सकाळी 8 वाजता प्रथम मानाचा व नवसाला पावणारा श्री दादा गणपतीची सवाद्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या मंडळाचा मिरवणुकीत युवती व महिलांनी ढोल – ताशांच्या निनादात ठेका धरला होता. परंपरेनुसार दरवर्षी दादा गणपती अग्रभागी असतो. मोठ्या सार्वजनिक मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभाग नोंदविला.
पोलीसांचा बंदोबस्त
जिल्ह्यात 104 सार्वजनिक, 25 खासगी व एक गाव एक गणपती अशा एकूण 140 गणेश मंडळाच्या श्री चे विसर्जन शांततेत पार पडले. संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अप्पर पोलीस अधिक्षक, 7 पोलीस उपअधिक्षक 18 पोलीस निरीक्षक, 58 सपोनि ़पोउनि , 922 पोलीस कर्मचारी, 111 महिला कर्मचारी, एसआरपीएफ ची 1 तुकडी तसेच 450 होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात होते.
नेते मंडळींचा सहभाग
देसाईपुरा परिसरात दादा गणपतीचा रथ आला असता, त्याठिकाणी खासदार डॉ. हीना गावित व आमदार विजयकुमार गावित यांनी परिवारासह पूजा करून आरती केली. मुख्य मिरवणुकीत सहभागी मंडळांचा अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकार्यांच्या नगरपालिकेचा राम रहीम उत्सव समिती तर्फे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्कार केला. गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी, आ.शिरीष चौधरी, डॉ. रवींद्र चौधरींसह अनेक नेतेगण सहभागी झाले होते
शांततेत विसर्जन
दादा व बाबा गणपतींचा रथ रात्री 9.30 वाजता जळका बाजारात आल्या नंतर हरिहर भेट झाली. यावेळी गणेश भक्तांनी प्रचंड जल्लोष करीत गुलालाची उधळण केली. त्यानंतर मिरवणुका पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्या. शहरातील मानाच्या गणपतींचे रात्री बारा वाजेच्या आत सोनी विहिरीत विसर्जन करण्यात आले. त्या नंतर इतर गणपतींचे विसर्जन झाले होते. सकाळपासून सुरू असलेला ढोलताशांचा निनाद बारा वाजेनंतर शांत झाल्यानंतर पोलीसांनीही सुटकेचा निश्वास सोडला,कुठलाही वाद न होता गणपतींचे अगदी शांतपणे विसर्जन करण्यात आले.
आदिवासी कलेचे सादरीकरण
महाराणा प्रताप युवक मंडळाची श्रींची विसर्जन मिरवणूक आकर्षणाचा भाग ठरली. ढोल – ताशे, डफ बडवत पारंपारिक आदिवासी कला पथकाचा नृत्याने अनेकांना भुरळ पडली. कार्यकर्त्यांनाही पथकातील कलाकारांसह सेल्फी काढण्याचा मोह अनावर झाला होता. माळी वाड्यातील सावता फुले प्रेरित व्यायाम शाळेचा मिरवणुक जल्लोषात निघाली. नंदुरबारच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला हरिहर भेटीचे महत्व अनन्य साधारण महत्त्व आहे.
30 मंडळांचे विसर्जन उत्साहात
नवापूर । अनंत चतुर्थीला दुसर्या टप्प्यातील नोंदणीकृत 30 मंडळाचे विसर्जन उत्साहात व शांततेत झाले. अनेक मंडळानी शहरातील प्रतिष्ठीत नागरीक यांना बोलवुन मंडळात त्यांच्या हस्ते आरती करुन सत्कार देखील केला. पोलीस विभागाने 12 दिवस चांगला बंदोबस्त ठेवला होता. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवला तर नगर पालिकेने मंडळांचा सुचनेचे पालन करुन विसर्जन मार्गाची दुरुस्ती व पथदिवे सुरळीत ठेवले होते. दरम्यान श्री गणपती मंदीर समोर सरदार चौक येथे श्री दादा व बाबा ची सालाबादा प्रमाणे हरीहर भेट होईल असे ठरले होते. मात्र ती हरीहर भेट मेनरोड झाली नियोजन चुकले. हरीहर भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मात्र भेट येथे न होता मेन रोड झाल्याने यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मिरवणूकीत कोणतेही अनुचित प्रकार घडले नसल्याने पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपुत यांनी नागरिकांचे आभार मानले आहे.
सीसीटीव्हीद्वारे नजर
तहसिलदार प्रमोद वसावे, उपविभागीय अधिकारी एकबोटे, पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, नायब तहसिलदार राजेंद्र नजन, मुख्य्धिकारी राजेंद्र शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप बुवा, संतोष भंडारे, दिपक पाटील, ताथु निकम, बबन सुर्यवंशी संगिता कदम, पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम, न.पा कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे, विज अभियंता राकेश गावीत, पो.का निजाम पाडवी हे उपस्थित होते. यावेळी गणेश विसर्जन मार्गावर पोलिसानी 10 सी.सी.कॅमेरे लावण्यात आले होते. यांची संपुर्ण माहिती वेळोवेळी पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत घेत होते.
या गणेश मंडळांचा समावेश
सकाळी पहिला 11 वाजता श्री शिवाजी हायस्कुल गणेश मंडळाची विसर्जन मिरवणुक निघाली होती. यावेळी शाळेचा मुलीनी फेटे बाधुन लिझीचा तालावर नृत्य केले. मिरवणुकीत दादा गणेश मंडळ, बाबा गणेश मंडळ, नेहरु गणेश मंडळ, युवा भोईराज गणेश मंडळ, देवमोगरा गणेश मंडळ, विर चंद्रशेखर आजाद गणेश मंडळ, शिव गणेश मंडळ, देवमोगरा गणेश मंडळ तीनटेबा, युवा गणेश मंडळ, ओम गणेश मंडळ, एकलव्य गणेश मंडळ, रिध्दी सिध्दी गणेश मंडळ, नवापुर युवक गणेश मंडळ, युवा प्रजापत गणेश मंडळ, मामा गणेश मंडळ, भारतीय गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, राजस्थान गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ करंजी ओवारा, जनता पार्क गणेश मंडळ, संगम गणेश मंडळ, बजरंग गणेश मंडळ, स्वामी विवेकांद गणेश मंडळ, महाकाल गणेश मंडळ सहभागी झाले होते.