नवी मुंबई :- गणेशोस्तव उस्तवात डीजे च्या तालावर ठेका धरणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा प्रकार गत दोन वर्षापूर्वी कोल्हापुरात घडला आहे. त्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तीत जीवनात आजमितीला अनेक अडचणी उपस्थित झाल्या आहेत.त्यामुळे असे प्रकार होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून गणेशोस्तव मंडळ व कार्यकर्त्यांना आव्हानात्मक जनजागृती सुरु केली आहे.
गणेशोस्तव १५ दिवसांवर येऊन ठेपला असता शहरातील सर्वच मंडळांनी त्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.त्याचवेळी पोलिसांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पावले टाकायला सुरवात केली असून नियमांचे पालन करा असे आव्हान करण्यात येत आहे.गणपती मिरवणूक काळात अनेक मंडळाकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने पोलिसांनी १५ दिवस अगोदरच सोशल मिडीयावर नियमभंग केले तर काय होते याची जनजागृती सुरु केली आहे.कोल्हापूर शहरात सन २०१५ मध्ये गणपती मिरवणूक दरम्यान अनेक मंडळांकडून कायद्याचे उल्लघन झाल्याने तब्बल १६ मंडळातील १५७ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने आजमितीला त्यांच्या वैयक्तित जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.गुन्हा दाखल असलेल्या एकाला महापालिकेत नोकरीची संधी मिळाली होती.त्याला पोलिसांकडून एन ओ सी आणण्यास सांगितली असता त्या एन ओ सी वर गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.त्यामुळे त्या कार्यकर्त्याला नोकरीपासून मुकावे लागले.क्षणाचा आनंद आयुष्याला खोड लाऊन गेल्याची प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांकडून उमटू लागल्याने भविष्यात अशी वेळ शहरातील तरुणांवर येऊ नये यासाठी पोलिसांकडून सोशल मिडीयावर जनजागृती केली जात आहे.१५७ कार्यकर्त्यापैकी ७ जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केला असता त्यानाही त्यावेळी अडचणी आल्या आहेत.अश्या प्रकारे शेकडो उस्तव कार्यकर्ते आजमितीला चांगल्या कामाला मुकले असून त्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.हजारोंच्या संख्यने गणेशोस्तव मंडळे शहरात उस्तव साजरा करत असून मिरवूनुकी दरम्यान या मंडळांवर अंकुश ठेवणे पोलिसांना कठीण जाते.त्यामुळे यापुढे अश्या मंडळांवर लक्ष ठेऊन दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्याचे तंत्रज्ञ पोलिसांकडून अवलंबले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे यंदाच्या गणपती मिरवनुकींवर पोलिसांचा वॉच राहणार आहे.