गणपती विसर्जन घाटाची पाहाणी

0

औंध : औंध गांव गणपती विसर्जन घाटाची पाहाणी प्रभाग समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे यांनी नुकतीच केली. यावेळी त्यांच्याबरोबर नगरसेवक प्रकाश ढोरे, आनंद जुनवणे, औंध क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी जगदीश जाधव, जीई गायकवाड, हवलदार आरोग्य विभागाचे डीएसआय विजय भोईर, टी.आर. साबळे आदी उपस्थित होते.

पावसाच्या पाण्याने येथे राडारोडा साचला असून सर्वत्र चिखल झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला असून लवकरच या घाटाची डागडुजी करावी लागणार आहे. या कामाची पाहाणी करून त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी ही पाहाणी करण्यात आल्याचे नगरसेवक ढोरे यांनी यावेळी सांगितले.