मुंबई : गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमच्या वापराला मुंबई हायकोर्टाने तूर्त नकार दिला आहे. सण येत जात राहतील, पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असं हायकोर्टाने सुनावलं आहे. यामुळे यंदा विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमणार आहे.
साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल करत या प्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. तांत्रिक कारणामुळे या प्रकरणी पुढील सुनावणी १९ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.