गणवेशासाठी पालकांचे हेलपाटे

0

निजामपुर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील झिरो बँलन्सवर विद्यार्थ्यांचे खाते उघडले नाही तरी विद्यार्थ्यांना गणवेश पासून वंचित राहवे लागत आहे. 15 आँगसटपर्यत विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा सुचना होत्या. परंतू बँकांनी वेळेवर खाते उघडून दिले नाही, यामुळे नाराजी पसरली आहे. शासनाने 10 वर्षीचा आतिल विद्यार्थ्यांना आईच्या व मुलांच्या संयुक्त खाते उघडावे असे आदेश आहे, परंतु अनेक विद्यार्थ्यांनी याअगोदर शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी वडिलांचा विद्यार्थीचा संयुक्त खाते सहीने बँकत खाते उघडलेले असतांना शासनाच्या नविन आदेशानुसार आई व विद्यार्थ्यांना संयुक्त खाते उघडण्यासाठी पालकांसह शिक्षकांना मोठे अडथळे येत आहे. एका विद्यार्थ्यांचा नावे दोन खाते उघडत असल्याने पालकांना संकटाला सामोरे जावे लागत आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना दोन गणेवशासाठी शासनाकडून फक्त 400 रुपये मिळत आहे. त्यासाठी 500 व 1000 रुपये भरून नविन खाते उघडावा लागत आहे. यासाठी पालक 400 रुपयांसाठी 1000 भरणा करण्यासाठी दुर्लक्ष करीत आहे. अगोदर गणवेश आणानंतर पैसे घ्या, ह्या शासनाच्या धोरण बरोबर नसल्याची नाराजी पालकांनी केली आहे. झिरो बँलसेवर खाते उघळत नाही. मुलाच्या पालकाच्या नावे गँस सबसिडीसाठी शासनाच्या विविध योजनासाठी बँक त अगोदर बचत खाते उघडलेले आहे. नवीन खाते उघडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आमच्या जुने सेवहीग खात्यात बँकेत आदेश करण्यात यावे, अशी मागणी पालक करीत आहे. पालकांचा जुन्या बचत खात्यात मुलांचा गणवेशासाठी मिळणार रक्कम जमा करावा किंवा पुर्वीप्रमाणे पैसा ना देता गणवेश मिळावा आमच्या मुलांना शिक्षण दया व गणवेश पुस्तक वह्या दया पैसे नाही अशी पालकांची मागणी आहे.